आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ मानली जाते. कुटुंबातील पावित्र्य प्रत्येक घटकावर अवलंबून असते. आपापसातील प्रेम, सामंजस्य, आपुलकी, सहकार्य यामुळे कुटुंब व्यवस्था सुरळीत चालते. कुटुंबामध्ये प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो तथापि सासू आणि सून हे नाजूक नाते असते. कुटुंबांमध्ये सासू आणि सुनेचे संबंध आई-मुलीसारखे असतील.
असेच पावित्र्य सर्व कुटुंबात असले तर कुटुंबामध्ये शांतता नांदेल, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी केले. येथील आगाशे सभागृहामध्ये आयोजित आदर्श सासू-सून पुरस्कार वितरण व तालुक्यातील सदृढ बालक-बालिका स्पर्धेतील विजेत्या बालकांचा बक्षीस वितरण समारंभ सामलेटी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. जया छतवाणी-कुकरेजा, पंचायत समिती महिला व बालविकास अधिकारी शोभा शिंदे, सुनील साळवे आदी उपस्थित होते. दरम्यान, राखी सुरडकर,शारदा सुरडकर, मीना माखीजा, हर्षा माखिजा, पूनम होले, मंगल होले, सुरेखा बाहुले, हिराबाई बाहुले, पटेल जुमनबी मैनुद्दीन, पटेल शबनूर साजीद, सीमा केदार, सुमन केदार आदी सासू सुनांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सुनील साळवे यांनी, सूत्रसंचालन डॉ. संजय दुशिंग यांनी, तर अाभार प्रवीण साळवे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.