आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळते ही पालक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आणि उल्लेखनीय बाब असते. ती गोष्ट आज सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद शाळेत घडते आहे.
या गोष्टीचा मला महिला अधिकारी म्हणून अभिमान आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार डॉ योगीता ढोले यांनी केले. सिद्धार्थनगर मध्ये शिष्यवृत्ती वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव घोडके होते. यावेळी श्रीगोंदे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, हृदय घोडके, रिपाइंचे तालुकाध्यक्ष माजी जिवाजी घोडके, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक घोडके, बजरंग घोडके, शिवाजी घोडके, राजेंद्र जगताप, शारदा ससाणे, रेणुका ससाणे, अविनाश घोडके, राघू ससाणे, माधव ससाणे, मनिषा ससाणे, नागेश उमाप, आशा नरवडे, सुरेखा नेटके, पप्पू घोडके, रेश्मा ससाणे, नामदेव शिंदे, उषा साळवे, कुणाल शिरवाळे, आकाश ससाणे, सुशांत ससाणे, उषा साळवे, आशा ससाणे, सचिन घोडके, अंजली जाधव, कविता ओहोळ, दादा ओहोळ, संजय ओहोळ आदी उपस्थित होते.
यावेळी सिद्धार्थनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील २० विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्तींचे चेक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी ह्रदय घोडके, संग्राम घोडके व आनंद घोडके यांची भाषणे झाली. १४३ विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळेत केवळ तीनच शिक्षक असून देखील ते प्रभाविपणे काम करत असल्याने ग्रामस्थांचे वतीने तहसिलदार व मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप मोटे यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षिका पुष्पा गरुड यांनी, तर आभार मंगल मोटे यांनी मानले.
शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य घडवणारी ठरणार
शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर होणारा आनंद मी लहान असताना अनुभवला आहे. आणि त्या प्रेरणेतूनच आज मी अधिकारी पदापर्यंत पोहचलो आहे. तेव्हा ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे उद्याचे भविष्य घडवणारी ठरणार आहे, असे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.