आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपावर तोडगा‎:भरली शाळा, सरपंचाच्या हाती खडू, फळा

कौठा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या पेन्शन योजनेसाठी गेल्या तीन‎ दिवसांपासून शासकीय कर्मचारी‎ संपावर गेल्याने शाळा बंद पडल्या‎ आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे‎ शैक्षणिक नुकसान होत होते. ही‎ बाब लक्षात आल्यावर फत्तेपूर (ता.‎ नेवासे) ग्रामस्थांनी शाळा सुरू‎ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार‎ शनिवारी (ता. १८) सकाळी ५०‎ टक्के विद्यार्थी शाळेत आले होते.‎ विद्यार्थ्यांनी परिपाठ झाल्यानंतर‎ गावचे सरपंच तुळशीदास शिंदे हे‎ शिक्षक झाले. त्यामुळे पालकांसह‎ विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले.‎ नेवासे तालुक्यातील फत्तेपूर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी‎ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू‎ करताना एकप्रकारे संपावर गेलेल्या‎ शिक्षकांना इशाराच दिला. गावाची‎ जबाबदारी सांभाळणारे सरपंच‎ तुळशीदास शिंदे यांनी शाळेचीही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धुरा खांद्यावर घेत, थेट हातात‎ पुस्तक घेऊन शिकवणीला सुरुवात‎ केली.

सुरुवातीला त्यांनी व‎ गावातील काही तरुणांनी सकाळी‎ शाळेचा परिसर स्वच्छ केला. नंतर‎ परिपाठ, प्रार्थना घेऊन पहिली ते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना‎ अभ्यासक्रम सुरू केला. शासकीय‎ कर्मचारी आपल्या मागण्या‎ शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी संप‎ पुकारला असल्याने अनेक ठिकाणी‎ शाळा व शासकीय कार्यालये बंद‎ पडल्याने नागरिकांसह पालक,‎ विद्यार्थी वैतागून गेले. शाळा बंद‎ झाल्याने ऐन परीक्षा काळात शाळा‎ बंद करून शिक्षक संपावर‎ गेल्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ‎ लागले.‎ काही ठिकाणी पालक शाळा‎ सुरू करणार असल्याचा इशारा‎ दिला. त्यामुळे फत्तेपूर ग्रामस्थांनी‎ जिल्हा परिषद शाळा सुरू करून‎ शैक्षणिक नुकसान भरून‎ काढण्यासाठी शाळा सुरू केली.‎ यावेळी फत्तेपूर सरपंच तुळशीदास‎ शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे‎ अमोल शेळके, दिगंबर फरताळे,‎ प्रवीण धुमाळ, भोलेनाथ धुमाळ,‎ उदय धुमाळ अादी उपस्थित होते.‎

नेवाशातील‎ पहिलीच शाळा सुरू‎
सरपंच शिंदे म्हणाले, शिक्षकाच्या‎ संपामुळे मुलांचे ऐन परीक्षा काळात‎ शैक्षणिक नुकसान होत असूनही‎ शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले, जास्त‎ नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही‎ तालुक्यात संप काळात पहिली शाळा‎ भरविली याबद्दल समाधान वाटते.‎

बातम्या आणखी आहेत...