आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतात जात जाणून घेतल्या अडचणी

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक दिवस माझा या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गुरूवारी दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन अडचणी जाणून घेतल्या. कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे व कानडगाव येथून या उपक्रमाची सुरवात झाली. या भेटीदरम्यान शास्त्रज्ञांनी संबंधित गावातील शासकीय, निमशासकीय संस्थांना भेटी दिल्या. शेतकऱ्यां बरोबर चर्चा करतांना त्या गावातील पीक पध्दती, प्रत्येक पिकावर येणारा खर्च व उत्पन्नाचा ताळेबंद जाणून घेतला.

कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान, शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान, गावामधील पीक पध्दती, ग्राम विकास आराखडा या बद्दल शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली. या शास्त्रज्ञांनी पूर्ण दिवस शेतक-यां बरोबर घालवत शेती कामामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या.यावेळी कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, शास्त्रज्ञ डॉ. वसंत पोखरकर, डॉ. गोकुळ वामन,डॉ. सचिन सदाफळ,डॉ. भगवान देशमुख,अन्सार शेख,डॉ. संजय तोडमल उपस्थित होते. विद्यापीठाचे आधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. मुकुंद शिंदे यांनी बाबुर्डी घुमट येथील शेतीवर तर विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञांनी इतर गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे व इतर शास्त्रज्ञांनी पाथर्डी तालुक्यातील शिराळ या गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देवून विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विक्रम जांभळे व डॉ. विलास आवारी या शास्त्रज्ञांनी मानोरी व देहरे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...