आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेहेराबाद येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवतार मेहेरबाबांच्या अमरतिथी उत्सवाची सांगता बुधवारी (१ फेब्रुवारी) विविध भाषेतील प्रार्थना व आरतीने झाली. यावेळी हजारो भाविकानी ‘जय मेहेरबाबा’ म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. मंगळवारी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत देश-विदेशातील लोकांनी भजने, बाबांवरील सांस्कृतिक व नृत्याचे कार्यक्रम, नाटक, गजल आदी कलाप्रकार सादर केले. बुधवारी (१ फेब्रुवारी) गाणी, नृत्य, भजने झाली व दुपारी २ वाजता आरती व प्रार्थना झाली. चेअरमन फॉमरोज मिस्री म्हणाले, की माझा जन्मोत्सव सगळीकडे साजरा करा, परंतु अमरतिथी फक्त मेहेराबादलाच साजरी करण्याचे मेहेरबाबा यांनी सांगून ठेवले होते. त्यांच्या हयातीतच टेकडीवर समाधीचे बांधकाम करण्यात आले होते.
चार बाजूला चार धर्मांची मनोरे उभारली आहेत. सप्तरंगी ध्वज येथे सतत फडकत असतो, जेणेकरून सर्व धर्म एकच असल्याचे प्रतीत व्हावे. अमरतिथी उत्सवात मागील तीन दिवसांत लाखो भाविक येथे आले. मात्र, कुठेही गडबड, गोंधळ झाला नाही. विविध भाषिक गाणी, नृत्य, वाद्य, कला, पेहेराव, नाटिका यांतून येथे सर्वधर्मीय जागतिक प्रेमसंमेलन भरल्याचा भास होत होता. मेहेरबाबा ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या. अखेर बुधवारी या उत्सवाची सांगता झाली. उत्सवासाठी आलेले भाविक आता परतू लागले आहेत.
भाविकच झाले स्वयंसेवक
उत्सवानिमित्त भाविकांना राहण्यासाठी तात्पुरते तंबू, स्वछतागृहे उभारली होती. पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधेसह महाप्रसादाची सोय केली होती. टेकडीच्या पायथ्याशी अल्पदरात उपहारगृहे, प्रसाद, फोटो व पुस्तकांची असंख्य दुकाने थाटली गेली होती. या उत्सवाची वैशिष्ट्य म्हणजे जवळपास सर्वच कामे भाविक स्वयंसेवक होऊन करीत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.