आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:गुणवंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाने उत्तरदायित्व स्वीकारावे

अकोले3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम गुरव समाजाच्या कुटुंबांनी दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे यावे. यासाठी समाजातील सधन कुटुंबानी गुरव समाजाप्रती आपले उत्तरदायित्व स्वीकारून सामाजिक बांधिलकीतून प्रामाणिक प्रयत्न करावेत. विविध प्रकारातील खेळात अभिनव कामगिरी करून दाखवतील. शैक्षणिक क्षेत्रातही उत्तुंग ध्येयवाद जोपासतील. याकरिता यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे उपक्रम राबवण्यावर भर द्यावा. यातून अनेकजण सनदी अधिकारी होतील व गुरव समाजाचे नावलौकिक वाढवतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब शिंदे यांनी केले.

गुरव समाजातील आर्थिक कमकुवत कुटुंबांच्या सर्वागीण उन्नतीसाठी अकोल्यात कोल्हार घोटी राज्यमार्गावर पाणओहळ येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. समाजातील सहयोगी कार्यकर्त्यांसह आण्णासाहेब शिंदे यांनी सचिन चौधरी व श्रीकांत चौधरी यांनी नव्यानेच सुरू केलेल्या जय मल्हार रेस्टॉरंट शाखा क्रमांक दोनलाही शुभेच्छा दिल्या. सचिन चौधरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्तविक अहमदनगर गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पांडे यांनी केले. अकोले नगरपंचायतचे नगरसेवक सागर चौधरी, जय मल्हार रेस्टॉरंटचे संचालक श्रीकांत चौधरी व अकोल्यातील गुरव समाजाच्या कार्यकर्त्यांसह गुरवझाप उपनगरातील ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यामधील सुप्त गुण ओळखून त्यांना ज्यात रस असेल, अशा त्यांच्या आवडीच्या विषयात चमकदार कामगिरी करण्यास संधी निर्माण करून द्यावी. त्यांना यासाठी लागणारी आवश्यक मदत केल्यास ते त्या-त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करतील, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आभार श्रीकांत चौधरी यांनी मानले.

विद्यार्थी समाजाचे जगात प्रतिनिधित्व करतील
गुणवंत विद्यार्थ्यांच्या गरज पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वोत्तम कामगिरीची दखल घेण्यात येईल. योगदानाबद्दल अशा समाजधुरिणांचा गौरव करण्यात करण्यात येईल, असे शिंदे यावेळी म्हणाले. समाजातील सधन व्यक्तींनी दिलेल्या मदतीवरच हे विद्यार्थी भविष्यात आपल्या गुरव समाजाचे जगात प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...