आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात:पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग अहमदनगरमध्ये मंदावला

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरमधील उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यातील कामाला वेग आला आहे. या कामासाठी 13 जूनपासून वाहतूक अन्य रस्त्याने वळवण्यात येणार होती. मात्र, अद्याप त्याची अधिसूचना जारी झाली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू असलेल्या चांदणी चौक ते स्टेट बँक चौकादरम्यान मंगळवार (14 जून) दुपारी एकपदरी मार्गाने एकेरी वाहतूक सुरू आहे. याच्या परिणामामुळे पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग काहीसा मंदावलाय. तर स्टेट बँक चौक ते चांदणी चौकातून औरंगाबादहून पुण्याकडे जाण्यासाठी दुहेरी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

85 काम पूर्ण

अहमदनगर शहरात होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम 85 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. पुढच्या पाच महिन्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तत्पूर्वी अंतिम टप्प्यातील महत्त्वाचे पिलर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चांदणी चौक व स्टेट बँक चौकात हे किलर टाकण्यात येत आहेत. तर बीएसएनएल कार्यालयासमोर देखील महत्त्वाचे काम सुरू होणार आहे. महत्त्वाच्या टप्प्यातील कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक 13 जून पासून इतर रस्त्याने वळवण्यात येणार होती. यासाठी 10 जूनपर्यंत हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप ही वाहतूक वळविण्यात आलेली नाही.

एकेरी वाहतूक

चांदणी चौकात लोखंडी कमान टाकल्यामुळे पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी वाहतूक मंगळवारी एकेरी होती. तर औरंगाबादहुन पुण्याकडे जाण्यासाठी दुहेरी वाहतूक सुरू होती. उड्डाणपुलाच्या कामामुळे पुणे व औरंगाबादहून येणारी वाहतूक काहीशी मंदावल्याचे चित्र दिसले.

पोलिस अधीक्षक घेणार निर्णय

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामात अडथळा येऊ नये, म्हणून वाहतूक वळवण्याबाबत पोलिस अधीक्षक वाहतूक विभागाबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल.

बातम्या आणखी आहेत...