आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुलक्ष:तीन वर्षांपासून पथदिव्यांचा प्रकाशच पडला नाही ; 125 घरे असलेली जय गणेश कॉलनी अंधारात

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव परिसरातील अरणगाव रस्त्यावरील शितल हॉटेलमागे असलेल्या जय गणेश कॉलनीत गेल्या ३ वर्षांपासून पथदिव्यांचा प्रकाशच पडलेला नाही. नागरिकांच्या पाठपुराव्याने या कॉलनीत नुकतेच खांबावर एलईडी लटकवले. मात्र तेही बंदच आहे. परिणामी, सव्वाशे घरे असलेली ही कॉलनी अंधारातच आहे. दरम्यान, संपूर्ण शहरात पूर्वीपेक्षा अधिक पथदिवे लावल्याचा महापालिकेचा दावा त्यानिमित्ताने फोल ठरला.

महापालिका हद्दीच्या सिमेवर असलेली ही कॉलनी आहे. ओढ्याच्या पूर्वीकडील बाजू बुरुडगावमध्ये, तर पश्‍चिमेकडील बाजू केडगाव हद्दीत येते. या भागात असलेली डिपी ग्रामीणची असल्याने महावितरण महापालिकेला पथदिव्यांसाठी कनेक्शन जोडू देत नाही. महापालिका व स्थानिक नगरसेवकही लक्ष देत नसल्याने हा प्रश्‍न प्रलंबित आहे. रात्री-अपरात्री कामानिमित्ताने घराबाहेर पडताना हातात टॉर्च घेऊनच बाहेर पडावे लागते. पथदिवे नसल्याने या भागात रात्रीच्यावेळी घरफोडी, चोरी, लुटमारीचे प्रकार घडत आहे. त्यामुळे महिलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे.

मनपाच्या कारभाराला नागरीक वैतागले असून, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र वाव्हळ, अमोद नलगे, टी. एम. वाघमारे, निवृत्ती घोडके, रामदास वाल्हेकर, सुभाष ठुबे, जयवंत पिंपळे, सागर काळे, राहुल कांकरिया, आकाश ठोंबरे, योगेंद्र कासार, अरुणा नलगे, संगीता नलगे, मंगल काळे, संजीवनी देशमुख, लता वाघमारे, छाया ठुबे, प्रतिभा कासार, डॉ. पानसरे, मनीषा गायकवाड, सोनाली गोरे, अरविंद घोडके, भरत गोरे, नरेंद्र दातीर आदी उपस्थित होते.

‘त्या’ तारा धोकादायक ग्रामीण भागासाठी याच कॉलनीतून जास्त विद्युत दाबाच्या वाहिन्या गेलेल्या आहेत. त्याच जुन्या खांबावर महापालिका हद्दीतील विद्युत तारा काही फुटाच्या अंतरावर आहेत. या लोंबकळणाऱ्या तारा नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासन व नगरसेवकांनी यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

बातम्या आणखी आहेत...