आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेबाबा यांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. आजही आपण स्वच्छतेवरच काम करत आहोत. नागरिकांनी स्वच्छता मोहीम ही लोक चळवळ समजून यात सहभाग द्यावा. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येकाने काम करावे. चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरणाचे महत्व पाटवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
मनपाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ.शंकर शेडाळे, वृक्षमित्र सुरेश खामकर, डॉ.सुधा कांकरिया, अंजली देवकर, अमोल बागुल, अभय ललवाणी, हरजितसिंह वधवा, डॉ. आश्लेशा भांडारकर, शारदा होशिंग, मुख्य स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे आदी उपस्थित होते.
श्रुती पारखे, पूजा ताठी, आराध्या गायके, आर्या निंबाळकर, तेजस्विनी खोडदे, श्रीपाद कुलकर्णी, प्रशांत केदारी, तमन्ना शेख, रोहन घोडके, ऋति कुरापट्टी, सावली शिंदे, श्रुती बांडले, आदेश शेखर, वरद घोडे, अपूर्वा नांदुरकर, अर्चना ताठी, रुचा सोहोनी, श्रावणी शिंदे, प्रिन्सिला बोर्डे, हमजा शेख, रुद्र आहेर, आयान तांबोळी, मोहम्मद खान, नहनुर सय्यद, प्रेमराज गुगळे, गौरी खाडे आदी विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.