आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक:विद्यार्थिनींनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी बनवल्या 650 राख्या

संगमनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी ६५० राख्या बनवल्या. त्यांनी बनविलेल्या राख्या सैनिकांना पाठवण्यात आल्याची माहिती प्राचार्य एच. आर. दिघे यांनी दिली.

तळेगाव दिघे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक प्रा. दीपक जोंधळे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे, प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमशील शिक्षक राधाकिसन दिघे, सुनील घुले, महेश उगार यांनी पाचवी ते बारावीत शिकणाऱ्या ६५० विद्यार्थींनींना राखी बनवण्याचे प्रशिक्षण दिले. विविध साहित्य वापरून त्यांनी राख्या तयार केल्या. विद्यार्थींनींनी बनविलेल्या राख्या भारतीय सीमेवर असणाऱ्या भूदल, नौदल, वायुदल आणि आफ्रिकेतील भारतीय जवानांना पोस्टाद्वारे पाठवल्या आहे. रक्षाबंधनानिमित्त विद्यालयात वृक्षांना राख्या बांधून ‘वृक्षाबंधन’ उपक्रम राबवण्याचा निर्धारही विद्यार्थीनींनी केला. विद्यार्थींनींनी राबविलेल्या उपक्रमाचे संस्थेने कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...