आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारात्र प्रशालेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शंभर टक्के लागला ही हिंदसेवा मंडळासाठी अभिमानास्पद बाब आहे. दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून उत्तम यश संपादन केले आहे. रात्रशाळेचे हे यश ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.मोडक बोलत होते. याप्रसंगी कार्याध्यक्ष अजित बोरा, उपकार्याध्यक्ष तथा चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, गजेंद्र गाडगीळ, देविदास खामकर, प्रा. शरद पवार, अशोक शिंदे, मंगेश भुते, अमोल कदम, बी. एस. गोर्डे, संदेश पिपाडा, महादेव राऊत, अनिरुद्ध देशमुख, अनिरुध्द कुलकर्णी, प्रशांत शिंदे, शिवप्रसाद शिंदे, वैशाली दुराफे, उज्ज्वला साठे, अविनाश गवळी, संदीप कुलकर्णी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे उपस्थित होते.
चेअरमन डॉ. कोठारी म्हणाले, दहावीच्या विद्यार्थ्यांनी दिवसा अर्थार्जन व रात्री ज्ञानार्जन करताना उत्कृष्ट यश संपादन केले आहे. दिवसेंदिवस रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे . शाळेत प्रथम क्रमांक- डोळस मिनल दगडू- ८१. ८० टक्के, द्वितीय कांबळे माया वालचंद-८०.२० टक्के, चौरे रुपाली हरिभाऊ ८०.२० टक्के, तृतीय-जावळे गुंफा बद्रीनाथ ७९-८० टक्के. सूत्रसंचालन वृषाली साताळकर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.