आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गांचे जाळे:सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग नगर जवळील शहापूरमधूनच थेट अक्कलकोटला जाणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग यापूर्वी शहापूर पासून नगर- सोलापूरच्या जुन्या रस्त्याने जाणार होता

उत्तर व दक्षिण भारतासाठी महत्त्वाचा असलेला सुरत- चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आता नगर शहराजवळील शहापूर (चांदबिबी) महलापासून ते थेट अक्कलकोटला जाणार आहे. हा महामार्ग संपूर्ण नवा असणार आहे. शहापूर ते अक्कलकोट हा रस्ता २८० किलोमीटरचा राहील. अक्कलकोटहून कर्नाटकातील गुलबर्गमार्गे चेन्नईला जाणार आहे. शहापूरपासून अक्कलकोटकडे जाणाऱ्या या नव्या रस्त्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात भूसंपादनासाठी गट मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान नगर शहराजवळून जात असलेल्या सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी गट मोजणीची प्रक्रिया सोमवारपासून (६ जून) नगर तालुक्यातील शेंडी या गावापासून सुरू झाली असून, पहिल्या दिवशी शेंडी गावातील चार गटांची मोजणी पूर्ण झाली.

केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात भूसंपादनासाठी गटांची मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आहे. सुरतहून नाशिक मार्गे नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील चौरकौठे गावापासून सुरत- चेन्नई राष्ट्रीय महामार्ग येणार आहे. नगर तालुक्यातील शहापूर (चांदबीबी महल) पासून हा नगर- सोलापूर रस्त्याला जोडला जाणार होता.

आता मात्र त्यात बदल करण्यात आला आहे. शहापूर पासून ते अक्कलकोट पर्यंत नवा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तो २८० किलोमीटरचा असणार आहे. त्याची प्राथमिक तयारी सुरू झाली अाहे. शहापूरपासून अक्कलकोटपर्यंत जाणाऱ्या या नव्या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मोजणी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील चिंचोली, आजमपूर, आरंभपूर व तळेगाव दिघे या गावातील गटांची मोजणी पूर्ण झाली आहे.

‘डीजीपीएस’द्वारे काही सेकंदात होते ५० हेक्‍टर क्षेत्राची मोजणी
यापूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यापूर्वी शेतीची मोजणी ही टेप द्वारे किंवा अन्य साहित्या द्वारे केली जात होती.आता मात्र अत्याधुनिकडीजीपीएस’यंत्राद्वारेअवघ्या काही सेकंदात ५० हेक्‍टर क्षेत्राची मोजणी केली जाते. यापूर्वी २० हेक्‍टर क्षेत्र मोजण्यासाठी दिवस लागायचा आता या यंत्राद्वारे अवघ्या काही सेकंदात क्षेत्रफळाची सर्व माहिती मिळते. आधुनिक यंत्रामुळे मोजणीसाठी वेळ वाचून पुढची मोजणी जलदगतीने होतील. हे यंत्र गुगल वर चालते. या यंत्राची रेंज अडीच ते तीन किलो मीटर असते.शेंडी गावात सोमवारी याच यंत्राद्वारे जमिनीची मोजणी करण्यात आली.

शहापूर ते अक्कलकोट नवा मार्ग चेन्नईला जाणार
या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया सोमवारपासून शेंडी गावात सुरू झाली . नगर तालुक्यातील गावांची मोजणी झाल्यानंतर राहुरी व राहाता तालुक्यातील गावांतील गटांची मोजणी केली जाईल. नगर- सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्ग नगर सोलापूरला रस्त्याला जोडला जाणार होता. दुसऱ्या टप्प्यात नगर तालुक्यातील शहापूर ते अक्कलकोट २८० किमीचा नवा महामार्ग होईल. तो अक्कलकोट मार्गे चेन्नईला जाईल. '' प्रफुल दिवाण, महाप्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग.

बातम्या आणखी आहेत...