आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्याजासह ११ लाखांची मागणी करत पैसे न दिल्याने येथील सह्याद्री कॉलेजच्या शिक्षकाला मारहाण केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी प्रेमदान हाडको परिसरात घडली. मनोज माधवराव पाटील (वय ४४ रा. प्रेमदान हाडको) असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका बड्या हॉटेल मालकासह पाच जणांचा समावेश असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पाटील फिर्यादीवरून नंदनवन हॉटेलचे मालक हेमंत जाधव ऊर्फ हिराशेठ, अनुज कोहिनकर व तीन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटील यांच्या क्लासेसमध्ये येणारे विद्यार्थी त्यांच्या ओळखीचे अनुज कोहिनकर याच्या ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज, शिराढोण (ता. नगर) येथे प्रवेश घेत असतात. यामुळे मनोज पाटील व अनुज कोहिनकर यांची ओळख होती. कोहिनकर याच्यासोबत हेमंत जाधव याचीही पाटील यांच्यासोबत ओळख झाली होती.
२९ नोव्हेंबर रोजी पाटील हे सह्याद्री कॉलेजच्या ऑफिसमध्ये काम करत असताना तीन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने ऑफिसमध्ये प्रवेश करून पाटील यांना ऑफिसच्या बाहेर काढले. ‘तू हिराशेठ यांचा फोन का उचलत नाही, हिराशेठ यांचे असलेले ११ लाख रूपये दे, असे म्हणत तिघांनी पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करत आहेत.
पैसे दिले नाही, तर गोळ्या घालून मारण्याची धमकी २० नोव्हेंबर रोजी दुपारी हेमंत जाधव याने फिर्यादी यांना हॉटेलवर बोलून घेतले होते. फिर्यादी व त्यांचे मित्र सुनील नारायण गायकवाड हे नंदनवन हॉटेलवर गेले होते. तेव्हा जाधव फिर्यादीला म्हणाला, ‘तुम्ही कोहिनकर सरांचे व्याजासह ११ लाख रूपये द्या, जर तुम्ही हे पैसे दिले नाही, तर मी कोण आहे, हे तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाल कधीही गायब करू शकतो, गोळ्या घालू शकतो, तुम्ही काय उद्योग करता मला माहिती आहे, असा दम दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.