आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या भावात घसरण:शेतकऱ्यांचा कांदा साठवणीकडे कल वाढला, बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटली

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याच्या भावात घट झाल्यामुळे शेतकरी सध्या आपला कांदा साठवून ठेवण्यावर भर देत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक घटली आहे. शेतकरी कांद्याच्या भाववाढीचा प्रतीक्षेत आहेत. पारनेर बाजार समितीमध्ये सध्या फक्त अडीच ते 3 हजार कांदा गोण्यांची आवक होत आहे. एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1200 ते 1400 रुपये भाव मिळत आहे. तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 600 ते 800 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याची लागवड नाशिक जिल्ह्यात होते. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लागवड केली जाते. अहमदनगर जिल्ह्यात 2021-22 च्या रब्बी हंगामात 1 लाख 90 हजार 529 हेक्‍टरवर कांदा पिकाची लागवड झाली होती. यातून भरघोस उत्पादनही शेतकऱ्यांना मिळाले आहे. परंतु मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाली आहे. पारनेर बाजार समितीमध्ये सध्या फक्त अडीच ते ३ हजार कांदा गोण्यांची आवक होत आहे. यापूर्वी 7 ते 8 हजार गोण्यांची आवक होत होती. परंतु भावात घट झाल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नसल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये कांद्याची साठवणूक केली आहे. शेतकरी आता कांद्याच्या भाववाढीचा प्रतीक्षेत आहेत. पारनेर बाजार समितीमध्ये रविवार, बुधवार व शुक्रवार अशी आठवड्यातील तीन दिवस कांद्याचा लिलाव होतो. सध्या पारनेर बाजार समितीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1200 ते 1400 रुपये भाव मिळत आहे. तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 600 ते 800 रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पानसरे यांनी दिली.

पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक घटली

कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील कांदा विक्रीसाठी काढत नाहीत. त्यामुळे बाजार समितीतील कांद्याची आवक कमालीची घटली आहे. शेतकरी आता कांद्याच्या भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.

महिनाअखेर कांद्याच्या भावात वाढ होईल

यावर्षी तापमान वाढीचा फटकाही कांद्याच्या पिकाला बसला आहे. शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवण केली आहे. परंतु उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे कांद्याची नासाडी झाली आहे. सध्या भाव कमी असले तरी एका महिन्यानंतर कांद्याच्या भावात वाढ होईल, असा अंदाज कृषी तज्ञांनी व्यक्त केला हे.

बातम्या आणखी आहेत...