आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंतची वाटचाल काँगेसच्या विचाराने केली व यापुढेही याच विचाराने काम करू काही लोकांनी गैरसमज पसरून आपल्याला भारतीय जनता पक्षापर्यंत पोहचवले. एवढेच नाही तर तिकिटाचे वाटपही करून टाकले, असे प्रतिपादन काँगेस नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. वाढदिवसानिमित्ताने ''शिंदेशाही बाणा'' या आयोजित कार्यक्रमात जनसमुदायासमोर त्यांनी आजारी अवस्थेत ऑनलाईन संवाद साधला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत चांगल्या मताने विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन करून आमदार थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील सुसंस्कृत सर्वात विकसनशील मोजक्या तालुक्यामध्ये संगमनेरचा वरचा क्रमांक आहे. सर्वात चांगले राजकारण चांगली संस्कृती आपली आहे, असे जाणकार सांगतात. विधान परिषदेचे निवडणुकीत झालेल्या राजकारणाने आपण व्यतीत झालो असून आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहे.
मात्र हे पक्षीय राजकारण आहे. यावर बाहेर बोलणे उचीत नाही. पक्ष व माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ, आपण काळजी करू नका. काँगेसचा विचार हाच आपला विचार राहील, याची ग्वाही दिली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता टीका करताना म्हणाले, सत्ता बदलानंतर तालुक्यावर सूड उगवावा असे हल्ले होत आहेत. कार्यकर्त्यांना अडचणीत आणून त्यांचे उद्योग व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या विकासाची कामे बंद पाडली जात आहे. आपण सत्ता आणि सत्ता बदल पाहिला आहे. सत्तेत राहीलो आहे. नागपूर येथे सकाळी मॉर्निंगवॉकला जाताना खड्ड्यात पाय सरकल्याने पडलो. तीन ठिकाणी फॅक्चर झाल्याने खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरानी प्रवास नाकारला. महिनाभर संगमनेरला नाही, असे कधीही झाले नाही. तालुका हे आपले कुटुंब आहे, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.