आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:तिघांनी केली एसटी चालकाला मारहाण

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ अपघातातून तिघांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री माळीवाडा येथे घडली. कलीम मुन्शी सय्यद (वय ४४ रा. बेलापुर खुर्द ता. श्रीरामपूर) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तीविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी विनावाहक शिवनेरी बस (एमएच ११ टी ९२५६) ही बस पुणे येथून घेऊन औरंगाबादकडे जात असताना माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ बसच्या पाठीमागून एक चारचाकी वाहन धडकले होते. त्यावरून एसटी चालकास मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...