आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जत (जि. नगर):कर्जतमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, वाईचे सचिन चव्हाण विजेते

कर्जत (जि. नगर)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार गुरुवारी शहरातील मैदानावर रंगला. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शर्यतींना बैलगाडाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्या, शिट्यांनी मैदान दणाणून गेले होते. शर्यतीत वाई (जि. सातारा) येथील सचिन चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रुप यांनी, तर तृतीय क्रमांक मान किशोर भिलारे यांनी पटकावला.

225 बैलजोड्या राज्यभरातून सहभागी 200 मीटर अंतराची बैलगाडा शर्यत

02 लाख 22 हजार 222 रु. रोख बक्षिसाचे चव्हाण मानकरी ठरले. द्वितीय क्रमांकास १ लाख 11,111, तर तृतीय क्रमांकास 77 हजार 777 पारितोषिक दिले.

बातम्या आणखी आहेत...