आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:येणारा काळ ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याचा असेल; केंद्रीय अन्नपक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री पटेल यांचे प्रतिपादन

संगमनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील ग्रामीण भागाचा विकास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात, धर्म, पंथ याचा कुठेही अडसर येऊ दिला नाही. शौचालयापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत योजनारुपी सहकार्य करताना, त्यांनी सामान्य माणूसच केंद्रीभूत मानला. त्यांनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले. येणारा काळ ग्रामीण भारताच्या उज्ज्वल भविष्याचा अमृतकाळ असेल, असे प्रतिपादन केंद्रीय अन्नपक्रिया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले.

भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेतंर्गत मालपाणी लॉन्स येथे आयोजित सरपंच, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांचा लोक प्रतिनिधी मेळाव्यात मंत्री पटेल बोलत होते. ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींची जबाबदारी आणि मोदी सरकारने मागील आठ वर्षात ग्रामीण भागाकरीता निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती त्यांनी यावेळी दिली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब मुरकुटे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, डॉ. सोमनाथ कानवडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, रोहिणी निघुते, रविंद्र थोरात, अमोल खताळ उपस्थित होते.

मंत्री पटेल म्हणाले, ग्रामीण विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. गावाचा विकास करताना प्रत्येक घटक केंद्र सरकारच्या योजनेचा लाभार्थी बनवला. प्रत्येकाला योजनेचा लाभ देताना मोदींनी विकासाचा विचार डोळ्यासमोर ठेवला. सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी भाजपने देशात प्रदीर्घ केलेली वाटचाल विचारांच्या आधारावर केली. त्यामुळे जनाधार वाढत गेला. लोकांची विश्वासार्हता देखील मोदी सरकारच्या बाजूने असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन कार्यान्वित झाले आहे. ग्रामीण भागात शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुठल्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे. हा विचार न करता या योजनेचा लाभ सर्वांना देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. योजनेतील ६० टक्के रक्कम केंद्राची आहे. याची जाणीव महाराष्ट्रातील मविआ सरकारने ठेवली नव्हती.

मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देश अन्नधान्य उत्पादनात आघाडीवर आहे. ठिकठिकणी वेअरहाऊस निर्माण केल्यामुळेच शेतकऱ्यांना धान्य साठवता आले. हे धान्य कोरोनात ८० कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेतून मोफत देता आले. आमदार डॉ. आहेर यांनी आजचा हा मेळावा म्हणजे लोकसभा निवडणूकीची नांदी असून याची सुरुवात संगमनेर विधानसभा मतदार संघातून झाली आहे. १८ महिन्यात गावपातळीवर आणि बूथस्तरावर योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

केंद्राच्या योजनांचे श्रेयासाठी आघाडी सरकार होते माहीर
केंद्र सरकारच्या सर्व योजनांचे श्रेय घेण्यात आघाडी सरकार माहीर होते. ग्रामीण विकासाचा अजेंडा ८ वर्षात भाजपने देशभरात यशस्वी करुन दाखवला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून ते लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघ शत प्रतिशत भाजप करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...