आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवलाई:नगरकरांनीही पाहिली आकाशातील गुढ रोषणाई; खगोल अभ्यासक म्हणतात तो उल्कापात, छायाचित्रकार मंदार साबळे यांनी काढले फोटो

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास आकाशातून वेगाने काही अग्नीचे गोळे पृथ्वीच्या दिशेने येताना दिसले. ही खगोलीय घटना राज्यभरात अनेकांनी पाहिली तशी नगरकरांनाही ती नजरेस पडली. छायाचित्रकार मंदार साबळे यांनी तत्काळ आपल्या कॅमेऱ्यात हे दृष्य कैद केले. हे दृष्य उल्कापात असल्याचे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर अद्यापही सोशल मिडियावर याबाबत उत्सुकता वाढवणारे संदेश व्हायरल होत आहेत.

नगर तालुक्यातील देहरे गावाच्या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याची माहिती सांगितली जात होती. त्यामुळे व्याघ्र सरंक्षण समिती सदस्य तथा छायाचित्रकार मंदार साबळे या परिसरात पाहणीसाठी शनिवारी सायंकाळी गेले होते. बिबट्याचा वावर असलेल्या शेतात शेतात पोहोचले. अंधारात ट्रॅप कॅमेरा लावून ते बिबट्याचा कुठे माग लागतो का याची पाहणी करत होते. तेथील शेतकरी जुनेद खान, सिद्धार्थ काळे, अर्जुन काळे, बाळासाहेब काळे, राजू काळे हे साबळे यांच्या समवेत होते. अचानक सगळ्यांचे लक्ष आकाशातून येणाऱ्या प्रखर गोळ्याकडे गेले. सुरवातीला ते विमान भासले, मात्र जवळ आले तसे त्यातून अजून चार पाच गोळे बाहेर पडले. जवळच केके रेंजचे युद्ध सराव क्षेत्र आहे. त्यामुळे हा युद्धसराव असल्याची शंका आली. जमिनीला समांतर एका लयीत वेगाने येणारे आगीचे गोळे काही क्षणात ते अंधारात विरले.

अनेकांना ती उलका पडली असावी असाही भास झाला. मात्र काही वेळातच चंद्रपूर जवळ एक धातूची रिंग पडली असल्याचे हे वृत्त्त सोशल मीडियावर वेगात व्हायरल झाले. विदर्भातील काही नागरिकांनी हे दृश्य मोबाईल मध्ये कैद केले.

ही खगोलीय दुर्मिळ घटना साबळे यांनीही क्षणाचा विलंब न करता कॅमेराबद्ध केली. साबळे नगरच्या भास्कराचार्य अस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर या खगोल शास्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी आहेत.

त्यांनी या घटनेबाबत औरंगाबादचे खगोल अभ्यासक श्रीनिवास औंधकर, पुण्याचे मयुरेश प्रभुणे व प्रा. दिनेश निसंग यांना माहिती दिली. ते याबाबत अधिक माहिती घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...