आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागातील क व ड वर्ग दर्जाचे कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या बदल्याची प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षापासून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर पडल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या या मंत्रालयात स्तरावरून होणार आहेत तर वर्ग क व ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून होणार आहेत.

महाविकास आघाडीतील तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बदल्यासाठी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याच कालावधीत राजकीय उलथापालथ सुरू झाल्यामुळे बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. सत्तांतरानंतर बदल्याची प्रक्रिया राबवली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...