आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौठा परिसरात खरिप हंगामाच्या तयारीला गती आली आहे. शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये शेतकरी गुंतला आहे. शेतकऱ्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. मागील वर्षी मिळालेल्या उच्चांकी भावामुळे शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल वाढला आहे.
यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होऊन दमदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ऊसापाठोपाठ नगदी पीक म्हणून कपाशीच्या पिकाकडे पाहिले जाते. मात्र ऊसाची तोडणी अभावी फरफट पाहता शेतकऱ्यांनी खोडवा किंवा त्यानंतर ऊसाचे पीक न घेता त्याऐवजी कपाशीसाठी तयारी सुरु केली आहे. तसेच कपाशीचे बियाणे शासनाने मुबलक प्रमाणात वेळेवर उपलब्ध करून दिले आहे. उसाची वाताहत झाल्याने शेतकरी वर्ग भुसार पिकाकडे वळला असला तरी मका, सोयाबीनवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो कपाशीला प्राधान्य देत पूर्वमशागतीची कामे केली करण्यास शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे बाजारभावाने व निसर्गाने चांगली साथ दिली. तर यावर्षी या पांढऱ्या सोन्यामुळे बळीराजाला व शेतीला ‘अच्छे दिन’ येण्याचे संकेत आहेत.
सध्या खरिपाच्या पिकांसाठी मशागती झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रा पूर्वीच पेरण्याचा श्रीगणेशा केला आहे. यंदा कडक उन्हामुळे पावसाळी हंगामही जोरदार राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षापासून ऊस शेती तोट्यात गेल्याने आता शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा होत आहे पर्यायाने परिसरात बहुतांश ठिकाणी उसाचे क्षेत्र घटले आहे.
पावसानंतरच लागवड करावी
शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, यासाठी कृषी विभागाची पथके तयार आहेत. नुकसान न होण्यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतरच कपाशी लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.