आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:तरुणांची गावाशी जोडलेली नाळ ही आदर्शवत; डाॅ.वायळ यांचे प्रतिपादन

राहुरी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध उद्योग व्यवसाय तसेच नोकरी निमित्त परगावी गेलेले शिरापूर येथील उच्चशिक्षित तरूणांनी आपल्या गावाशी जोडलेली नाळ ही इतरांपुढे आदर्श ठेवणारी असल्याचे मत राहुरी कृषी विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञ डाॅ.चांगदेव वायळ यांनी व्यक्त केले.शिरापूर येथील साई सेवा कला, क्रीडा,कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठानने सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डाॅ वायळ म्हणाले शंभर टक्के बागायत असलेल्या शिरापूरमध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे. संलग्न म्हणून दुग्धव्यवसायाची जोड शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.

येथील उच्चशिक्षित तरुणांनी शेती, दुग्धव्यवसाय, नोकरी, प्रशासकिय अधिकारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर तसेच उद्योग व्यवसायात आपला नावलौकिक केला आहे. गावातील सुशिक्षित तरुण व जाणकार नागरिकांनी एकत्र येवून स्थापना केलेल्या साई सेवा कला, क्रीडा, कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शाळा, कॉलेज, खेळ, नोकरी, शेती, उद्योग व्यवसाय तसेच सामाजिक कार्यात नैपूण्य व प्राविण्य मिळवणाऱ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्याची परंपरा गेली २० वर्षापासून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...