आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Undisputed Dominance Of The Re founder Madhukar Navale Group Over Abhinav Shikshan Sanstha; Ninety Supporters Win 15 0 In Board Of Trustees Election |marathi News

शैक्षणिक:अभिनव शिक्षण संस्थेवर पुन्हा संस्थापक मधुकर नवले गटाचेच निर्विवाद वर्चस्व; विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत नवले समर्थक 9 जणांचा 15 - 0 ने विजय

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील अभिनव शिक्षण संस्थेची त्रैवार्षिक विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले व इतर ८ समर्थकांनी १५ विरुद्ध ० मतांनी विजय मिळवला. या निकालाने यापुढेही अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले हेच कार्यरत राहतील. या संस्थेतील २० पैकी १५ सदस्यांनी आपले भक्कम पाठबळ मधुकर नवले यांना दिले.

संस्थेतील २० सभासदांच्या खुल्या मतदाना प्रक्रियेतून संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले विरुद्ध वादग्रस्त अध्यक्ष सुरेश कोते व सचिव भाऊसाहेब नाईकवाडी यांच्या लढाईत मधुकर नवले यांनी बहुमत सिद्ध केले. विश्वस्तांच्या बहुमताच्या जोरावर या संस्थेवर अध्यक्ष कोण हा वाद न्यायालयात गेला. मधुकर नवले यांनी २८ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जाहीर केलेली विश्वस्त मंडळाची निवडणूक न्यायालयीन आदेशानुसार तहकूब ठेवावी लागली. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ६ मे रोजी अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ७ मे रोजी पूर्ण केली.

२० सभासद मतदानास पात्र होते. पैकी ५ सभासदांनी निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरवली. मतदान प्रक्रियाच कायदेशीर नसल्याचे कारण देत सुरेश कोते यासह ५ सभासद मतदान प्रक्रियेपासून अलिप्त राहिले. त्यामुळे संस्थेच्या २०२२ ते २०२५ च्या त्रैवार्षिक विश्वस्त मंडळावर संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांच्यासह ९ जण १५ विरुद्ध ० मतांनी विजयी घोषित करण्यात आले. मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सभासदांतून मधुकर नवले, ल. का. नवले, विक्रम नवले, डाॅ. अर्चना खताळ, भागवत नवले, अरुण नवले, विवेक नवले, अल्फोन्सा पालीशेरी, जयश्री देशमुख हे कार्यकारी विश्वस्त म्हणून तीन वर्षांसठी निवडून आले. निवडणूक प्रक्रियेत या ९ सभासदांसह राधिका नवले, सुमन नवले, अश्विनी शिंदे, दिलीपकुमार मंडलिक, संतोष लांडगे, गणेश काळे यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तर भाऊसाहेब नाईकवाडी, सुरेश कोते, भक्ती हिवरकर, रंजना नाईकवाडी, गिरीश नाईकवाडी हे मतदान प्रक्रियोपासून अलिप्त राहिले.

अध्यक्षपदी मधुकर नवले
निवडणुकीनंतर अभिनव शिक्षण संस्थेतील नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाची बैठक होऊन संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी अरुण नवले व विवेक नवले, सचिवपदी डाॅ. अर्चना खताळ, सहसचिवपदी भागवत नवले व जयश्री देशमुख, तर कोषाध्यक्षपदी विक्रम नवले यांची नियुकती झाली. सुरेश कोते व भाऊसाहेब नाईकवाडी यांच्या कुटुंबातील सभासदांना विश्वस्त मंडळावर नियुक्त करण्यात आले नाही.

मतदान प्रक्रिया कायदेशीर
संगमनेर न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर दाखल अर्ज फेटाळण्यात आला. २८ एप्रिल रोजी स्थगित करण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेतील कायदेशीर अडसर दूर झाल्यानंतर ७ मे रोजी सर्व मतदान प्रक्रिया कायदेशीरपणे व इनकॅमेरा राबवण्यात आली. २० पैकी १५ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. यातील ९ सभासदांनी अर्ज दाखल केल्यानंतर खुल्या मतदानातून १५ विरुद्ध ० मतांनी सर्व उमेदवार निवडून आल्याचे घोषित केले.
- मधुकर नवले, निवडणूक निर्णय अधिकारी, अभिनव शिक्षण संस्था.

बातम्या आणखी आहेत...