आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर:जोर्वे सोसायटीत मंत्री थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व; जनसेवा मंडळाचे डिपॉझिट जप्त

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या जोर्वे सेवा सोसायटीच्या निवडणुकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने १३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. विरोधी जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना एकही जागा मिळवता आली नाही. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

तालुक्यात जोर्वे सेवा सोसायटी प्रबळ मानली जाते. रविवारी सोसायटीच्या १३ जागांसाठी मतदान पार पडले. ५८४ पैकी ५६७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे २४०- २६० मताच्या फरकाने शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार विजयी झाले. कर्जदार मतदार संघातून गोरक्षनाथ काकड, विठ्ठल काकड, सोपान कोल्हे, राजेंद्र थोरात, सुधीर थोरात, रघुनाथ दिघे, संजय दिघे, सतीश बोरकर, अनुसूचित जाती जमातीमधून साहेबराव यादव, इतर मागासवर्गीय संघातून बादशहा इंगळे, महिला राखीवमधून केशरबाई इंगळे, अनुसया थोरात तर विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग मतदार संघातून विजय गिरी हे सार्वधिक (४३४) मतांनी विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून रामदास वाकचौरे यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, सत्यजित तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, सुरेश थोरात, माणिक यादव, व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष
जोर्वे सोसायटीत शेतकरी विकास मंडळाची सर्व उमेदवार विजय झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोश केला. फटक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत मंत्री थोरात व इंद्रजीत थोरात यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

बातम्या आणखी आहेत...