आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वागणूक चिंतेचा:महिलांना मिळणारी असमानतेची वागणूक चिंतेचा विषय

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या २१ व्या शतकात महिला पुरुष समानतेच्या दृष्टीने लिंगभाव संवेदनशीलता तसेच समानता समाजात रुजवणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांना असमानतेची मिळणारी वागणूक हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे, असे प्रतिपादन पाथर्डी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार यांनी केले.

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व बाबुजी आव्हाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगभाव समानता कायदेविषयक शिबिरात बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सहदिवाणी न्यायाधीश मयूर गौतम, पाथर्डी वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. नीलेश दातार, सचिव अॅड. अय्याज शेख, अॅड. नितीन वायभासे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, गणेश दानवे, के. एस. ढाकणे, दत्ता गोबरे, प्रा. डॉ. सुभाष शेकडे, डॉ. भगवान सांगळे आदी उपस्थित होते.

बिराजदार म्हणाल्या, आजही महिलांना असमानतेमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुलींना घरातूनच असमानतेचा सामना करावा लागतो. पुढे समाजातही हीच स्थिती दिसते. भारत हा विकसनशील देश असला तरी विकसित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र लिंगभाव समानतेच्या दृष्टीने आपण जगाच्या खूप मागे आहोत. लिंग संवेदनशीलतेबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. घरामध्ये पालकांनी तर महाविद्यालयात शिक्षकांनी ही असमानता दूर होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी रँगिंग कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. रँगिंग सारख्या घटना शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे परंतु सुदैवाने पाथर्डी तालुक्यात रँगिंगची एकही घटना घडलेली नाही ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे याचा आवर्जून उल्लेख केला.

सह दिवाणी न्यायाधीश मयूर गौतम यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियामाविषयी व त्याअंतर्गत येणाऱ्या कायद्यांविषयी माहिती दिली तर सचिव अय्याज शेख यांनी विद्यार्थ्यांना आजचा युवक याविषयी मार्गर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ढाकणे यांनी, सुत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली आहेर यांनी, तर आभार प्रा. डॉ. अर्जुन केरकळ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...