आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर केमिस्ट असोसिएशनने वर्षभर सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. कै. अशोक रेणुगुंठला यांच्या स्मरणार्थ वाडिया पार्क येथे फ्लड लाइट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आपल्या मित्राला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. वाडिया पार्क डॉक्टर्स केमिस्ट व एमआर, मॅनेजर यांना एकत्र येण्यासाठी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण केले. प्रत्येकाला दैनंदिन जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे. खेळाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये जिव्हाळा व प्रेम निर्माण होते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
वाडिया पार्क केमिस्ट परिवाराचे कै. अशोक रेणुगुंटला यांच्या स्मरणार्थ आयोजित केमिस्ट चॅम्पियनशिप लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मुख्य प्रायोजक सिद्धी ग्रूप स्काय ब्रीजचे संचालक मनोज छाजेड, मुकेश छाजेड, सहप्रायोजक श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित बडवे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, संजय चोपडा, विशाल गर्जे, डॉ. मिलिंद पोळ, सुनंदाताई रेणुगुंटला, डॉ. संतोष गांगर्डे, डॉ. हेमंत नाईक, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. गोपाल बहुरूपी, डॉ. नितीन नागरगोजे, डॉ. सचिन पाडुळे, डॉ. सचिन रक्ताटे, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. महेश जरे, डॉ. वैभव भोईटे ,डॉ. हर्षवर्धन तन्वर, केमिस्ट अससोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष चेतन कर्डिले, विशाल शेटिया, मनीष सोमानी, संदीप कोकाटे, रुपेश भंडारी, प्रशांत पाटील, मनोज खेडकर, नीलेश शर्मा, रोहन गुंडू, अभिजित जाधव, अभिजित गांगर्डे, राहुल जाधव, रीनुल गवळी, सौरभ झालानी, तुषार काळे, कमलेश गुंदेचा, वैभव वाघ, श्रीनिवास बोडखे, अमित गोयल, किरण रासकर, अविनाश काळे, भूपेंद्र खेडकर, राजू रोहोकले, नीलेश कडवा आदी उपस्थित होते.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून खेळाची मैदाने बंद होती. आता ही मैदाने खुली झाली. आपण सर्वांनी मिळून खेळायची ज्योत पेटवली. केमिस्ट असोसिएशनने आपल्या मित्राच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून मित्राबद्दलचे प्रेम व आपुलकी सिद्ध होत आहे. दत्ता गाडळकर यांनी प्रास्ताविक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.