आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Upliftment Of The Nation Is Possible Only If The Behavior Is Done Keeping In Mind The Definition Of Country Worship; Statement Of Bhagyashree Sathye |marathi News

समारोप:देश पूजेची व्याख्या लक्षात घेऊन वर्तन ठेवले तरच राष्ट्राची उन्नत्ती; भाग्यश्री साठ्ये यांचे प्रतिपादन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवाचं दर्शन घेतो तसं देशाचं दर्शन घ्यावं, भारत-भ्रमण करावं, म्हणजे आपला देश किती महान आहे याची ओळख होते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना हे दिवस आपणास कोणामुळे मिळाले त्याची स्मृती ठेवून, त्यांची देश पूजेची व्याख्या लक्षात घेऊन आपले वर्तन ठेवले तर राष्ट्राची उन्नत्ती होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय राष्ट्र सेविका समितीच्या सहसंयोजिका भाग्यश्री साठ्ये यांनी केले. नगरमध्ये रेणाविकर माध्यमिक विद्यालय सावेडी येथे आयोजित राष्ट्र सेविका समिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रवेश शिक्षा वर्गाचा समारोप झाला. यावेळी साठ्ये बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक महेश इंदाणी उपस्थित होते. साठ्ये म्हणाल्या, पंधरा दिवस २४ तास एकत्र राहून जे गुणार्जन होते त्याचा उपयोग घरासाठी, समाजासाठी व राष्ट्रासाठी होतो. पावलं जुळवून घेत असताना मनंही जुळतात आणि समाजाबरोबर जुळण्याची, एकमेकांना सांभाळून घेण्याची क्षमता येते. यातून निर्माण होणारा आपलेपणा सेवेकडे कधी घेऊन जातो हे कळतही नाही. देवपूजे प्रमाणे देश पूजेच्या पायऱ्या ठरवाव्यात तोच भाव देश पूजा करताना ठेवावा म्हणजे राष्ट्र देवो भव ही कल्पना साकार होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योजक इंदाणी यांनी राष्ट्रसेविका समितीच्या शिबिरातून भगिनी वर्ग स्व:संरक्षणासाठी तयार होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक कार्यवाहिका शैला देशपांडे यांनी केले.सूत्रसंचालन शहर कार्यवाहिका निशा कलेढोणकर यांनी, तर आभार शुभदा गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली तर वंदेमातरमने सांगता करण्यात आली.

आत्मबल वाढवणाऱ्या लाठीकाठीचे प्रात्यक्षिक
पंधरा दिवसांच्या प्रवेश शिक्षा वर्गात चर्चा कार्यशाळा आणि बौद्धिक यातून मुलींना मानसिक बौद्धिक सक्षम करताना स्वसंरक्षण व अष्टावधानाचे शारीरिक शिक्षण देण्यात आले त्यांचे प्रात्यक्षिक उपस्थितांसाठी आकर्षण ठरले. आपल्या अवयवांचा शस्त्र म्हणून वापर करून शत्रूच्या मर्म स्थळावर आघात करणे शत्रूचा आघात परतवून लावणे तसेच आत्मबल वाढवणाऱ्या लाठीकाठी चे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...