आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:अर्बन सस्पेन्स खातेप्रकरणी सुनावणी आता 12 जुलैपर्यंत पुढे ढकलली

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याची सुनावणी १२ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणात सुरेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी व संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्याचे कारण सांगून ही सुनावणी पुढे ढकलण्याची केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली.

बँकेच्या सस्पेन्स खात्यातून १५ धनादेश वटवले गेले. यातून काही खासगी व्यक्तींची कर्ज थकबाकी अदा केली. या कृत्याबद्दल रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला ५ लाखाचा दंडही केला. न्यायालयात दाखल खटल्यात आधी गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते. मात्र, बँकेचे लेखा परीक्षण करणाऱ्यांच्या न्यायालयीन सरतपासणीत सुरेंद्र व देवेंद्र गांधी या बंधूंचे व संगीता अनिल गांधी यांचे नाव स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या तिघांनाही समन्स बजावले. त्यांच्यावतीने अ‍ॅड. राहुल जामदार हजर झाले. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करायची असल्याने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...