आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी शास्त्रज्ञांमुळे देशात हरितक्रांती होऊन आपला देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला. मात्र, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे आरोग्य खालावले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३६ वा पदवीदान समारंभात स्नातकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती, तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, पद्मश्री पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य चिमणराव पाटील, दत्तात्रेय उगले, डॉ. प्रदीप इंगोले, गणेश शिंदे, संजीव भोर, अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, विद्या शाखेच्या उपकुलसचिव आशा पाडवी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, भरडधान्य हे गरीबांचे धान्य म्हणून गणले जायचे, पण त्याच्यातील पौष्टीकता लक्षात घेता, भरडधान्यांना आता जगात मान्यता मिळाली आहे. त्याचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थीच ग्रामीण भारताचा विकास करु शकतात. यावेळी ६२ विद्यार्थ्यांना पी.एचडी., ३८२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, तर ६३८८ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
चारुदत्त मायी, पवार यांचा गौरव
कृषी क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी व पद्मश्री पोपटराव पवार यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.