आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:संगमनेर साहित्य परिषदेचा वसंतोत्सव कार्यक्रम विविध मराठी गीतांनी रंगला, रसिकही मंत्रमुग्ध झाले

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याच्या सायंकाळी संगमनेर साहित्य परिषदेचा वसंतोत्सव हा मराठी भावगीत, भक्तिसंगीत आणि मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाने रंगला. रसिकही मंत्रमुग्ध झाले.

येथील कालिका माता मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध गाण्यांवर प्रतिभा देशपांडे, विकास खेडकर, अनघा खेडकर, दर्शन जोशी, दीपक क्षत्रिय, मंगला पाराशर, विजय दीक्षित, शोभा काळे यांनी ठेका धरत रसिकांची मने जिंकली. संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले, दिलीप उदमले, विकास भालेराव, मनोज साकी, गिरीश सोमाणी, ज्ञानेश्वर राक्षे, शोभा बाप्ते, पुष्पा निऱ्हाळी, हिरालाल पगडाल, सुरेंद्र गुजराथी, संजय नेने, तनुष पठाडे, रघुनाथ वाघ, ललित देसाई, महेश गोडसे, राजेंद्र वेल्हाळ, लहानू सदगीर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...