आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग:मढी-तिसगाव रस्ताकामासाठी ग्रामस्थांनी अडविला महामार्ग

तिसगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मढी ते तिसगाव या दीड किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन होऊन चार महिने झाले, तरी ठेकेदाराने काम सुरू झालेले नाही. रस्त्याचे काम तातडीने सुरु करुन पाच किमी रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शिवसेना व मढी ग्रामस्थांनी पाथर्डी-नगर महामार्गावर मढी फाटा येथे सुमारे एक तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे नगर-पाथर्डी मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पुढील चार दिवसांत खड्डे बुजवू, तसेच दीड किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शिवसेना व मढी ग्रामस्थांनी नुकतेच तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंत्यांना रस्तादुरुस्तीची मागणी केली होती. त्यावर कार्यवाही न झाल्याने शिवसेनेचे पदाधिकारी व मढी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जानेवारी) सकाळी दहा वाजता नगर- पाथर्डी महामार्गावर मढी फाटा येथे रस्त्यावर ठिय्या दिला. मढीचे सरपंच संजय मरकड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मरकड, देविदास मरकड, भाऊसाहेब निमसे, आसाराम ससे, ग्रामपंचायत सदस्य भानविलास मरकड, शरद कुटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...