आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझादी गौरव पदयात्रा समारोप:सरकारविरोधी बोलणाऱ्याचा आवाज दाबला जातोय

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पूर्वी जनतेला ईडी, इन्कमटॅक्स काय असतं हे फारसं माहिती नव्हतं, मात्र आज जो कोणी सरकार विरोधात बोलेल त्याला नोटीस पाठवून दाबण्याचे काम केले जात आहे. तरीही बोलला तर तुरुंगात टाकले जात आहे. सत्तेसाठी काहीही हे भाजपच ब्रीदवाक्य आहे, अशी टीका माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली.

काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रा व संवाद कार्यक्रमाचा समारोप नगर शहरामध्ये झाला. याप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सचिन गुजर, करण ससाने, प्रताप शेळके, राजेंद्र नागवडे, ज्ञानदेव वाफारे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, दशरथ शिंदे, उषा भगत, अभिनय गायकवाड, प्रवीण गीते, सुजित क्षेत्रे, निलेश चक्रनारायण, उमेश साठे, राणी पंडित, प्रा.डॉ. बापू चंदनशिवे उपस्थित होते.

शहर काँग्रेसने सभेच्या नियोजनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून युवक कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले. थोरात म्हणाले, वर्षाला दोन कोटी नोकऱ्या, पंधरा लाख देण्याची फसवी घोषणा केली गेली. डिझेल, पेट्रोल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पूर्वी भाजप थोडी दरवाढ झाली तरी रस्त्यावर यायचे, पण आता ते कुठे गायब झाले आहेत हे माहीत नाही, असा सवालही त्यांनी केला.

काँग्रेसचे नगरसेवक कुठे ?
मोठ्या कालावधीनंतर नगर शहरात काँग्रेसचा मोठा मेळावा होत असताना, महानगर पालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले, एकही नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते. काँग्रेसच्या नगरसेविका संध्या पवार, रूपाली वारे, रिजवाना शेख, सुप्रिया जाधव गैरहजर होतेच. तसेच दीप चव्हाण व त्यांच्या पत्नी नगरसेविका शीला चव्हाण देखील गैरहजर होत्या. त्यामुळे या नगरसेवकांना निरोप दिले नाहीत, की तेच आले नाहीत याबाबत चर्चा आहे.,

बातम्या आणखी आहेत...