आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:पाणी योजनेमुळे महिलांचा वेळ वाचेल अन‌् आरोग्य सुधारेल

पिंपरणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बचतगटांमुळे गावातील बचत गटातील महिलांना रोजगार मिळेल. गटाच्या माध्यमातून महिलांना कर्जही मिळेल. पाणी योजनेमुळे गावातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार तर आहेच, परंतु स्वच्छ पाणी मिळणार आहे. त्यामुळे महिलांचा वेळ वाचेल व आरोग्य सुधारेल, असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांनी केले

संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद््घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथभाऊ अरगडे व पंचायत समितीचे पाणी पुरवठा उपअभियंता गडदे उपस्थित होते.

कानवडे यांची संगमनेर तालुका कॉंग्रेस आय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाखुरी गावच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामजिक कार्यकर्ते लक्षमण मोरे व वृक्षमित्र शिवाजी पानसरे यांचा सत्कार गावातर्फे कानवडे व डॉ. थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जाखुरीचे सरपंच नितीन पानसरे, उपसरपंच राजेंद्र पानसरे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर बागुल, राधाकिसन देशमुख, चंद्रकला भालेराव, अनिता राहणे, अर्चना मांडे, सुनिता राहणे, शारदा देशमुख, ग्रामसेवक गोसावी, सोसायटीचे चेअरमन गोरख राहणे, बाळासाहेब राहणे, किसन पानसरे, शिवाजी पानसरे, राजेंद्र देशमुख, भास्करराव बागुल, सदाशिव भालेराव, नाथा पानसरे, रंगनाथ पानसरे, पुंजा रहाणे, भाऊसाहेब पानसरे, भिमाशंकर पानसरे, दशरथ देशमुख, सामाजिक कार्यकर्ते लक्षमण मोरे, गोरक्षनाथ म्हस्के, वृक्षमित्र शिवाजी पानसरे, आप्पासाहेब राहणे उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्र पानसरे यांनी, सूत्रसंचालन दत्तात्रय पानसरे यांनी तर आभार बाळासाहेब रहाणे यांनी मानले.

पाणी योजनेसाठी ८०० कोटींचा निधी मंजूर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी पाणी योजनेसाठी ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. संगमनेर खुर्द गटासाठी संपूर्ण १८ गावे ६ वाडी वस्तीसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झालेला आहे, असे मिलिंद कानवडे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...