आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाथपंथी डवरी गोसावी समाजातील विवाह सोहळ्यात संविधान उद्देशिकेचे वाचन करून लग्न सोहळ्याला सुरुवात केली. नाथपंथी डवरी गोसावी तसेच शिंदे कुटुंबातील पहिला मुलगा बीए शिक्षण पूर्ण झालेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन केल्यामुळे व संविधानातील हक्क अधिकार समजल्यामुळे माझ्या समाजाला संविधान समजावे संविधानाची ओळख व्हावी म्हणून शिंदे व सावंत यांचा आगळावेगळा विवाह सोहळा झाला. भटके-विमुक्त समाजात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीने विवाह पार पाडण्यात आला.
हा विवाह संविधान प्रचारक आजिनाथ शिंदे यांचे लहान भाऊ राजू शिंदे यांचा होता. शिंदे आणि सावंत यांचा हा विवाह सोहळा झाला. याप्रसंगी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संस्थापक अरुण जाधव, संस्थेचे संचालक बापू ओहळ, द्वारका पवार, सचिन भिंगारदिवे, अनिल लष्कर, अतुल ढोले, सागर बांगरे, पाटोदाचे माजी सरपंच गफार पठाण व विशाल पवार, शितल काळे, तुकाराम पवार, गणपत कराळे, अतिश पारवे, आजिनाथ शिंदे व ग्रामीण विकास केंद्र जामखेड टीमचे वैजीनाथ केसकर, संतोष चव्हाण, संगीता केसकर, छाया भोसले, संतोष भोसले आदी उपस्थित होते. संविधान उद्देशिकेचे वाचन हे पारधी समाजातील तुकाराम पवार व शीतल काळे यांनी केले, अशी माहिती संविधान प्रचारक गणपत कराळे यांनी दिली. दरम्यान, या अनुकरणीय उपक्रमाचे जामखेड तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे. संविधानाची माहिती होण्यासाठी उपक्रम लाभदायी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.