आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:महिलेवर कोयत्याने हल्ला

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाला शिवीगाळ करत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेवर कोयत्याने हल्ला करून तिला जखमी करण्यात आले. सुरेखा शंकर वाकळे (वय ३५, रा. महात्मा फुले चौक) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हल्ला करणारा इजाज गफार शेख (रा. गाझीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी रात्री १० वाजता महात्मा फुले वसाहतीच्या कमानीजवळ ही घटना घडली असून पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री सुरेखा वाकळे यांच्या मुलाला इजाज शेख हातामध्ये कोयता घेऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. सुरेखा सोडवण्यासाठी मध्ये गेल्या असता इजाजने त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या झटापटीत इजाजच्या हातातील कोयता सुरेखा यांच्या पायाला लागून त्या गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...