आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Work Done By Pankaja Munde When The BJP Did Not Have An Indirect Team Is Politics; Politics Based On The Results Of The Legislative Council Elections

चर्चा तर होणारच:संख्याबळावर केलेले काम हे समाजकार्य, संख्याबळ नसताना केलेले काम राजकारण; पंकजांची टोलेबाजी

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संख्याबळावर केलेले काम समाजकार्य असते, तर संख्याबळ नसताना केलेले काम हे राजकारण असते, अशी टोलेबाजी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अहमदनगरमध्ये बोलताना विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर केली. या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचे पंकजांनी अभिनंदन केले.

अहमदनगर येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील स्नेहलयाच्या वतीने मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यावेळी उपस्थित होते.

मुंडेंनी 17 मते फोडली

पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यसभेच्या कलाने विधानपरिषदेचा ही निकाल जाईल ही अपेक्षा होतीच. अशा अनेक निवडणुका आम्ही लढलो, जिंकलो. जिथे संख्याबळ कमी होते तिथे. जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा निवडणूक असो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 17 मते एकदा फोडली होती. असेही पंकजा मुंडे यांनी यांनी सांगितले.

सरकारवर भाष्य नाही

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना सरकार अस्थिरतेबद्दल विचारले असता, मी यावर भाष्य करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली