आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, औद्योगिक तसेच घरगुती आणि लघु उद्योगातील ग्राहक हे कमी दाबाच्या वीज पुरवठ्याच्या समस्येशी झुंजत आहेत. त्यामुळे तालुक्याला मंजूर झालेले २२० केव्ही वीज उपकेंद्राचे काम लवकर सुरू करण्यात यावे, यासाठी पढेगाव येथील उडान व नेताजी फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना येत्या ४ फेब्रुवारी रोजी श्रीरामपुरात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साकडे घालण्यात येणार आहे.
याबाबत जितेंद्र तोरणे, रणजित बनकर, प्रवीण लिप्टे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, श्रीरामपूर तालुक्यातील जनता या समस्येमुळे खूप खूप त्रस्त आहे. या समस्येतून आपल्या तालुक्यातील सर्व स्तरातील वीज ग्राहकांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी नेताजी फाउंडेशन, उडान फाउंडेशन यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला आहे.
२०२० मध्ये तालुक्याला २२० केव्ही वीज मंजूर झाले आहे. त्याची उभारणी लवकरात लवकर करून आपल्या तालुक्यातील जनतेची वीज पुरवठा विषयीची गंभीर समस्येचा कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आम्ही आपल्या तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी, औद्योगिक आणि घरगुती वीज ग्राहक आणि जनतेला दिलासा मिळणार आहे. शेतीला योग्य दाबाने वीज पुरवठा होईल, रोहित्र व्यवस्थित चालतील, जळण्याचे प्रमाण कमी होईल, वीज पुरवठा वारंवार खंडित होणार नाही, उद्योग सुरळीत सुरू राहतील, घरगुती ग्राहकाना दिलासा मिळेल, एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग येण्यास पोषक वातावरण तयार होईल, त्यामुळे तालुक्यातील बेरोजगार तरुणांना उद्योग तसेच रोजगार मिळतील, असेही निवेदनात नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.