आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर मनपा प्रशासनाने बंद पडलेली सीना नदी पात्राची हद्द निश्चित मोहीम भूमि अभिलेख विभागाच्या सहकार्याने गुरुवारपासून पुन्हा सुरू केली.
नदी पात्रालगत असलेल्या खासगी जागांची मोजणी करून त्यांची व पात्राची हद्द निश्चित केली जाणार असल्याचे व मनपाने नियुक्त केलेल्या खासगी संस्थेमार्फत निश्चित झालेल्या हद्दींची जीपीएसद्वारे विकास आराखड्यावर नोंद घेतली जाईल, असे मनपाने सांगितले.
सीना नदी पात्र व पूर नियंत्रण रेषेचे सर्वेक्षण करत कुकडी पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे नकाशे सादर केले होते. मात्र, या नकाशाद्वारे हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी खासगी जागेत हद्द दर्शवण्यात आली होती. त्यामुळे ही मोहीम ठप्प झाली होती.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवल्यावर कुकडी पाटबंधारे विभागाने हद्द निश्चितीबाबत हात झटकले. भूमि अभिलेख व मनपा प्रशासनाने खासगी जागा मोजून त्यांची हद्द निश्चित करावी व उर्वरित हद्द नदी पात्र म्हणून नोंद करावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानुसार आता भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे हद्द निश्चितीचे काम करत आहेत. नागापूर येथील पुलापासून गुरुवारी हे काम सुरू करण्यात आले. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अर्जुन जाधव, भूमी अभिलेख विभागाचे रवी डीक्रूज, आरोटे कन्सल्टंटचे गणेश भोईटे यांच्यासह नगररचना विभागातील कर्मचारी व अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
नागापूर पुलाखाली खासगी जागा मोजून हद्द निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला खासगी जागांची हद्द निश्चित केल्यावर नदी पात्राच्या लगत प्रत्येक जागा मोजून खासगी हद्द निश्चित केली जाणार आहे.महापालिका व भूमि अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नदी पात्रालगत जागांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.महापालिका व भूमि अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नदी पात्रालगत जागांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.