आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख मार्गांवर रस्त्यांची दुरावस्था:विसर्जन मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गांवर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मोहरम व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर प्राधान्याने काम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली.

शहरातील बहुतांशी प्रमुख मार्गांवर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येत्या काळात शहरात मोहरम व गणेश उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली होती. आयुक्त पंकज जावळे यांनी याची तातडीने दखल घेत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे आदेश मनपाच्या बांधकाम विभागाला दिले होते.

त्यानुसार महापालिकेकडून काम सुरू करण्यात आले आहे. मोहरम उत्सवातील कत्तलची रात्र व सवारी मिरवणूक मार्गावर, तसेच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने खडी अंथरूण त्यावर डांबराचे पॅचिंग करण्यात येत आहे. पावसाने उघडीप दिल्याने मनपाकडून वेगाने काम सुरू करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...