आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गुलमोहर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलमोहर रस्त्याचे काम सुरू असून मनपा प्रशासनाने गुलमोहर रस्त्याच्या कामाची वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे. डांबरीकरणाचा स्प्रे मारला नसल्यामुळे काही ठिकाणी खडीकरण उखडले असून खड्डे पडले आहेत.

मनपा प्रशासनाने रस्त्याच्या कामाच्या दर्जेकडे लक्ष देऊन उत्कृष्ट रस्त्याचे काम करून घ्यावे याचबरोबर संपूर्ण पारिजात चौकाचे डांबरीकरण करावे, जेणेकरून या चौकाला शोभा येईल. जेणेकरून या रस्त्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे, अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे. यावेळी समवेत सामाजिक कार्यकर्ते बापू जानवे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...