आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासौंदाळा येथील तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण व योग्य असलेल्या जलजीवन मिशन योजनेचे काम लवकर पूर्ण करावे व विरोध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नेवासे-शेवगाव मार्गावर दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. पुढील ८ महिन्यांवर ग्रामपंचायत निवडणूक आल्याने राजकारण डोळ्यासमोर ठेवून काही विघ्नसंतोषी लोकांनी विकासकामे हाणून पाडण्याकरिता योजनेसाठीची विहिर व टाकीची जागा योग्य नसल्याबाबत तक्रारी केल्या. सौंदाळा गावासाठी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली असून, त्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा मुख्य उद्भव आहे.
गावाजवळून जाणारा मुळा धरणाचा कालवा उन्हाळ्यात मार्च ते जून महिन्यापर्यंत १०-१५ दिवसांच्या अंतराने कायमस्वरूपी दीड-दीड महिन्याचे आवर्तन असते. यामुळे जलजीवन मिशन अंर्तगत पिण्याच्या पाण्याची विहिर घेण्यासाठी कालव्यालगत २ गुंठे जागा बक्षिसपत्र करून घेतली आहे. या विहिरीची जागा कनिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांनी पाहणी करून योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच बक्षिसपत्र करून दिले आहे. सौंदाळा गाव कमी उंचीवर असल्याने गावठाणामध्ये जागा घेतल्यास वाड्या-वस्त्यांवर पाणी जाणार नाही. त्यामुळे गट नंबर १८६ मधील उंचावर टाकीसाठी जागेचे बक्षिसपत्र करण्यात आले आहे. ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने त्यास मंजुरी देऊन काम सुरु करण्याची वर्कऑर्डर दिली आहे. हे काम पोलिस बंदोबस्तात पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.