आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्य:स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे, असे प्रतिपादन राहुरीच्या माजी नगराध्यक्ष डाॅ.उषा तनपुरे यांनी केले. राहुरीच्या महात्मा फुले चौकात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तनपुरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सचिन मेहेत्रे, जीवन गुलदगड, शुभम धाडगे, माजी नगरसेविका संगिता आहेर, अशोक आहेर, जगन्नाथ सुर्यवंशी, आप्पासाहेब मकासरे, पवन शिंदे, दीपक गुलदगड, बाबासाहेब सत्रे, संतोष डागवाले, संदीप राऊत, सचिन राउत, संकेत दुधाडे,बाळासाहेब गिरमे, दीपक मेहेत्रे, डॉ. भालेराव, राजेंद्र सिन्नरकर, मळू शिंदे, पत्रकार राजेंद्र वाडेकर, सतीश फुलसौंदर, सोमनाथ गाडेकर,हरिष शेलार सह मिञमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वांबोरी येथे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती सुभाष पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राहुरी डाॅ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, माजी सरपंच वन्याबापू राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश राऊत, यादव हजारे,संजय खरात, ज्ञानदेव तांबटकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक तुपे, दिपक साखरे, सुनिल शिंदे,भरत सत्रे, जालिंदर कांबळे, रामकिसन कुऱ्हे, प्रजोत पुंड, भैया मन्सुरी, सलमान शेख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...