आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वगुणसंपन्न जो असतो, तोच खरा महंत असतो. समाज प्रबोधनाचे काम संत महंत करीत असतात. सगळ्यांच्या शरीराला आकार आहे. परंतु त्याच्या मनावर काय संस्कार झाले आहेत, त्याला महत्त्व आहे. संत म्हणजे चांगले विचार. याच चांगल्या विचारांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा गौरव होतो, तो गौरव त्याचा नसून त्याच्या गुणांचा असतो. बाबांच्या गुणांचा हा अभिष्टचिंतन सोहळा असल्याचेे प्रतिपादन सभाध्यक्ष जयराजबाबा शास्त्री (साळवाडी) यांनी केले.
राजेंद्रमुनी विराट उपाख्य व जयराजबाबा विराट यांना निमगावकर बाबा ही गादी मिळाल्याबद्दल अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी सभाध्यक्ष जयराजबाबा शास्त्री (साळवाडी) बोलत होते. याप्रसंगी नागापूरचे आचार्य वाल्हेराजबाबा, पातूरकरबाबा, जयराजबाबा शास्त्री, घुगेबाबा, कृष्णराजबाबा लाड, प्रभाकरबाबा आराध्ये, मल्लेबाबा, फाटेबाबा, अॅड. बाबासाहेब रणसिंग, भगवानराव अनारसे, सुदामराजबाबा धाराशिवकर, अशोकराज अमृते, अमोल काल्हेकर, पंडितबाबा आदी उपस्थित होते.
जयराजबाबा विराट म्हणाले, चक्रधरस्वामींचे विचार सर्वदूरपर्यंत पोहोचवण्याचे काम यामागेही करीत आलो आहे व यापुढेही करीत राहणार आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क आला. चांगले विचार मनात असतील, तर आपणही लोकांना चांगले उपदेश करू शकतो. चक्रधर स्वामी समाज प्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले असून, समाजाला त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. निमगावकर बाबा ही गादी मला मिळाली असून ही गादी मिळाली ही मी माझे भाग्य मानतो, असे सांगितले.
यावेळी वाल्हेराजबाबा यांनी जयराजबाबा विराट यांना आशीर्वाद दिले. त्यांच्याच हस्ते अभिष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मानेबाई वायदेशकर, प्रभाकरबाबा आराध्ये, पातूरकरबाबा, अशोकशास्त्री अमृते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पंडितबाबा वायदेशकर यांनी केले. आभार अॅड. बाबासाहेब रणसिंग यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.