आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक स्त्री म्हणून गिर्यारोहण, ट्रेकिंग, प्रस्तरारोहण या साहसी क्षेत्रात योगदान देणे निश्चितच सोपे नाही, परंतु जेव्हा एक आई आपल्या मुलांसमोर असे स्वतःचे आदर्श निर्माण करते, तेव्हा पुढची पिढी नक्कीच धाडसी बनते. जेव्हा तुम्हाला वाटेल, की आता आपण थकलोय, तेव्हा तुमची खरी ताकद दाखवा, नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही जे काही कराल, त्यात पूर्ण प्रयत्न करा. नगरच्या महिलांचे साहसी क्षेत्रातील कार्य खरोखर गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अॅड स्कूलचे स्पोर्ट्स ऑफिसर कर्नल जे. एस. धूल यांनी केले.
येथील ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साहसी क्षेत्रात योगदान देणाऱ्या सह्याद्रीच्या लेकींचा ‘सह्याद्री अचिवर्स अॅवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला. सोनाली धूल, प्रा. गिरीश कुकरेजा, कामगार न्यायालयाचे न्यायाधीश शरद देशपांडे, उद्धव शिंदे, संजय शिंदे, सीए असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र काळे, ट्रेकयात्री गिर्यारोहण संस्थेचे प्रमोद टोणपे, भारती शेवते, सीमा चोभे, स्वप्नील गोरे, राजेंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, मॅरेथॉन रनर प्राची पवार, डॉ. स्मिता उगले, कांचन पानसंबळ, अनूजा शिंदे, एकता कनोजिया, ग्रीष्मा घोडके, बॅडमिंटनमधील राष्ट्रीय खेळाडू सई काळे यांना ‘सह्याद्री अचिव्हर्स अॅवार्ड’ देऊन गौरव करण्यात आला.
तसेच गिर्यारोहक अक्षय भापकर, सुरेश जगदाळे, अमित सोनग्रा, आकाश पातकळ यांचा प्रस्तरा रोहण मोहिमेत सहभाग घेतला. त्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रा. गिरीश कुकरेजा यांनी ‘महिलांचे गिर्यारोहण आणि तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यान दिले. महिलांकडून परिवारातील सर्व जण अपेक्षा ठेवतात, परंतु या अपेक्षा पूर्ण करता करता महिलांनी स्वतः कडेही लक्ष दिलं पाहिजे. स्वसंवाद साधण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोनाली धूल म्हणाल्या, की आईने आपल्या मुलांच्या मनात भीती निर्माण करु नये. त्यांना धाडशी बनवावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चोभे यांनी केले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर तेजस स्वामी यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.