आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्लोबल वार्मिंगच्या संकटाची चाहुल सर्व जगाला लागल्यामुळे जागतिक पातळीवर हे संकट रोखण्यासाठी विविध उपाय योजना अंमलात आणण्यात येत आहेत.प्रत्येक देशांवर काही निर्बंध टाकून,त्यांना जबाबदारी व कर्तव्यांची जाणिवही करुन देण्यात आलेली आहे. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज झाल्याने आपल्या देशात ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेल्या या चळवळीमुळे अनेक फायदे आता दिसू लागले आहेत. त्यामुळे युवकांबरोबरच सर्वजण वृक्षसंवर्धानाच्या कार्यात देत असलेले योगदान हे आपल्यासह भावी पिढीसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे उपाध्यक्ष जावेद अब्बास तंबोली यांनी केले.
भिंगार छावणी परिषदेच्या महात्मा गांधी उर्दू स्कूलमध्ये उर्दू सप्ताह निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबिद दुलेखान होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मखदुम सोसायटीचे उपाध्यक्ष जावेद तंबोली, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल छावणी परिषदेचे मुख्याध्यापक संजय शिंदे, सरदार वल्लभ भाई पटेल स्कूल छावणी परिषदचे मुख्याध्यापक राजेन्द्र भोसले, शाळाव्यवस्थापन समितिचे अध्यक्ष अकिलशेख, लियाकत भाई, सगीर शेख, अंजुमशेख उपस्थित होते.
यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रस्ताविक करतांना सय्यद मुबीना नौशाद यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देतांना विधार्थांना कश्या प्रकारे हसत खेळत अभ्यास घेतला जातो याचे प्रत्येक्ष प्रात्यक्षिकासह सांगितले. सुत्रसंचलन सय्यद सुमैय्या आज़म यांनी, तर आभार अरविंंद कुडिया यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.