आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:त्या पाच रस्त्यांच्या दुरावस्थेला त्या लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच जबाबदार

देवळाली प्रवराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील त्या पाच रस्त्यांच्या दुरावस्थेला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार लहू कानडे यांच्यासाठी मते मागणारे स्थानिक कार्यकर्तेच जबाबदार असल्याची चर्चा दिव्य मराठीच्या वृत्तांनंतर सुरू झाली आहे. स्वतःला लोकप्रतिनिधींचे कट्टर कार्यकर्ते समजणाऱ्या गाव पुढाऱ्यांनी आपल्या परिसरातील रस्त्याचा प्रश्न किती वेळा मांडला, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

वळण, मानोरी, आरडगाव, पाथरे खुर्द, महाडिक सेंटर, माहेगाव, खुडसरगाव, टाकळीमिया येथील दोन्हीही लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी जर या रस्त्यांसाठी ठामपणे भूमिका घेऊन रस्ता झाल्याशिवाय आमच्या गावात प्रवेश करू नका, असा घरचा आहेर जर माजी मंत्री तनपुरे आणि आमदार कानडे यांना दिला. तर या पाचही रस्त्यांचे काम व्हायला वेळ लागणार नाही, असे ग्रामस्थ आता बोलून दाखवत आहेत. त्याचबरोबर रस्त्यांच्या कामासंदर्भात एखादा सर्वसामान्य मनुष्य बोलू लागला तर त्याचा आवाज दाबण्याचं काम हेच कार्यकर्ते करत असतात त्यांनी ग्रामस्थांचा आवाज दाबण्यापेक्षा आपला आवाज मोठा करून जर लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगितले तर तालुक्यातील सर्वच रस्ते उत्कृष्ट होतील, असे असे सर्वसामान्य नागरिकाचे मत आहे,तालुक्याच्या पूर्व भागातील या कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या भागातील रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्याची वेळ आता आली आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतर आज देखील सामान्य माणूस लोकप्रतिनिधीला थेट प्रश्न विचारण्यास कमी पडतो आहे,अशी स्थिती आहे.

पाथरे खुर्द येथील रणछोडदास जाधव ते म्हणाले, आमच्या गावातील रस्त्याच्या दुरावस्थेस सर्वपक्षीय कार्यकर्ते जबाबदार आहोत. अडीच वर्षा पूर्वी आमच्या उमेदवाराला घेऊन आमच्या गावातील,परिसरातील मतदाराकडे मते मागण्यासाठी गेलो होतो. मतदारांनी इकडे कानडे आणि तिकडे तनपुरे यांना आमदार केले,अडीच वर्षे सत्तेत असून देखील रस्ते मात्र तसेच राहिले,आता लोक आम्हाला विचारतात कधी होणार पूर्ण रस्ता. त्याचे उत्तर आमच्याकडे नाही.वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके म्हणाले, मी देखील शिवसेनेत असताना लोकांना मते मागितली होती मी सुद्धा रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार आहे. निवडून कोण आले हा विषय नाही मुद्दा कामाचा आहे. मुद्दा रस्त्याचा आहे. हा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी मूग गिळून बसण्यापेक्षा मोठ्या मोठ्या आवाजात रस्त्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत, कार्यकर्त्यांनी माजी मंत्री तनपुरे आणि आमदार कानडे यांना अगोदर रस्ते करा आणि मगच गावात प्रवेश करा असा स्पष्ट इशारा दिला पाहिजे नव्हे, तसा फलकच आपल्या गावात लावला पाहिजे असे चोळके यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...