आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Young Students Enjoyed The Forest Meal; A Visit To Datta Mandir Devasthan By Students Of 1st To 4th Grade Of Vidyamandir School In Shevgaon| Marathi News

सहल:चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला वनभोजनाचा आनंद; शेवगावातील विद्यामंदिर शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दत्त मंदिर देवस्थानला भेट

शेवगाव शहरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत वनभोजनाचा आनंद घेतला. प्राथमिक विद्यामंदिर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची सहल दत्त मंदिर देवस्थान व वृंदावन बालोद्यान देशपांडे गल्ली येथे नेण्यात आली. दत्त मंदिर देवस्थानचे मठाधिपती वंदना भारदे व वृंदावन बालोद्यान चे संचालक नितीन भाऊ दहिवाळकर यांनी सहलीचे स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका परवीन पटेल, कैलास धनवडे, सहलप्रमुख अविनाश पुरनाळे, मंगेश वसावे, मच्छिंद्र टेकूळे, ऋषिकेश आढाव,सुवर्णा नरवडे, अर्चना सूडके, रुपाली फलके, वनिता वाणी, पटेल नर्गिस, कविता वांढेकर आदींचे स्वागत करण्यात आले. वृंदावन उद्यान मध्ये विद्यार्थ्यांनी खेळायचा मनसोक्त आनंद लुटला.

त्यानंतर गुरुदेव दत्त महाराज यांचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानच्या परीसरातील,अवतीभोवती असलेले, प्लास्टिक, कागद, बॉटल्स यांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ केला. यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये वंदना भारदे काकू यांच्या अध्यक्षतेखाली ,मुख्याध्यपिका व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये गीत गायन, विनोद ,चुटकुले , देशभक्तीपर गीत अशा विविध अंगी कार्यक्रमाने व विविध गुणदर्शन कार्यक्रम रंगला. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...