आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या भरारी पथकाने आज तपासणी केली. तपासणीत वीज मीटरच्या मूळ जोडणीमध्ये छेडछाड करून 82 हजार 969 विद्युत युनिटस म्हणजे एकूण 10 लाख 57 हजार 800 रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले. महावितरणने दिलेल्या फिर्यादीवरून कारखाना चालकाविरुद्ध संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याला थ्री फेज वीजजोडणी देण्यात आली आहे. महावितरणच्या भरारी पथकाने आज अचानक या वीजजोडणीची तपासणी केली असता ही वीज चोरी उघडकीस आली. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार पवार, कनिष्ठ अभियंता डी.जी. पंडोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. जाधव व यू. इ. बागडे यांनी ही कारवाई केली. महावितरण नाशिकच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युतकुमार विजय पवार यांनी संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली आहे.
बेकायदा वीज वापरणारे रडारवर
आजच्या कारवाईनंतर महावितरणतर्फे सांगण्यात आले की, वीज चोरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे वीज वापर करणारे महावितरणच्या रडारवर आहेत. भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ नुसार वीजचोरी करणाऱ्याला कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही क्लृप्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करू नये. तसेच आकडे टाकून वीजचोरी करणे थांबवून अधिकृत वीज जोडणी घेऊनच वीजेचा वापर करावा. विजेचा अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.