आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:खिडकीचे गज कापून 74 हजार रुपये किंमतीच्या हरभरा बियाणांची चोरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डिग्रस शिवारातील घटना

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डिग्रस शिवारातील गोडावूनच्या खिडकीचे गज कापून ७४ हजार रुपये किंमतीचे हरभरा बियाणे चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. डिग्रस गावाच्या शिवारातील गट नंबर १३२ मधील एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प कार्यालयाच्या गोडाऊनच्या खिडकीचा गज कापून बियाणांची ही चोरी झाल्याची फिर्याद कृषी विद्यापीठ प्रशासनाने राहुरी पोलिसात दिली आहे. अज्ञात इसमाने गोडाऊनमध्ये प्रवेश करून ७४ हजार ४०० रुपयांच्या हरभरा बियाण्याच्या २० गोण्या चोरून नेल्या आहेत.

या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश सानप करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...