आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:पिंप्री-लौकी अजमपूर येथे चार लाखांची चोरी; रोख रक्कमेसह नऊ तोळ्याचे दागिने लांबवले, घटना रविवारी रात्री ते पहाटेदरम्यान घडली

पिंपरणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथील घराचे कुलूप उचकवून घरा प्रवेश करत बेडरूममधील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी ४० हजारांच्या रोकडसह नऊ तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने अशा ४ लाख १९ हजार २०० रुपयाच्या ऐवजाची चोरी केली. ही घटना रविवारी रात्री ते पहाटेदरम्यान घडली.

याबाबत गणेश सोपान दातीर यांनी पोलिसात फिर्याद दिली. दातीर गावच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या शेतात राहतात. उन्हाळ्या दिवस असल्याने संपूर्ण कुटुंब हे घराच्या गच्चीवर रात्री साडेदहानंतर दरवाजाला कुलूप लावून झोपायला गेले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूमध्ये असलेल्या लाकडी कपाटातील एकदाणी, ओमपान, नथ, आंगठ्या, मचल्या, नॅकलेस, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, रिंगा अशा दागिन्यांच्या ऐवजासह ४० हजार रुपयांची रोकड लांबवली. सकाळी ६ वाजता गच्चीवरून खाली आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष भोये, उपविभागीय पोलिस आधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती घेतली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...